महाराष्ट्र उद्यापासून लॉकडाऊन; सर्व शहरांत जमावबंदी लागू

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्या सकाळपासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन राहणार आहे. या काळात मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व नागरी भागांत १४४ लागू करण्यात आले आहेत. याचाच अर्थ राज्यात लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असणार आहे.