मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. करोनाचा मुकाबला करण्यासाठी १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात येत आहेत. येत्या ३१ मार्चपर्यत ही बंदी राहणार आहे. त्याची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.