मुंबईसह देशभरात घुमला थाळ्या, टाळ्या आणि घंटानाद

देशावर ओढवलेल्या करोना साथीच्या संकटातही अहोरात्र सेवा देत असलेल्या अत्यावश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांना आज अवघ्या देशाने सलाम केला. जनता कर्फ्यूदरम्यान सायंकाळी ठिक पाच वाजता घराच्या खिडकीत येऊन, गच्चीवर जाऊन लोकांनी शंख, टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून जिगरबाज कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ दिले. अवघ्या देशात एकाचवेळी घंटा आणि थाळीनाद घुमला.