'जनता कर्फ्यू'त उद्या पहाटे पाचपर्यंत वाढ: आरोग्यमंत्री



जनता कर्फ्यू'त उद्या पहाटे पाचपर्यंत वाढ: आरोग्यमंत्री





मुंबई: जनता कर्फ्यूत वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. जनता कर्फ्यूमध्ये उद्या, पहाटे पाच वाजेपर्यंत वाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा त्यांनी केली. करोनाशी लढा देणाऱ्या आणि अहोरात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

जनता कर्फ्यूदरम्यान संध्याकाळी मुंबईसह राज्यातील नागरिकांनी करोनाशी लढा देणाऱ्या अत्यावश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे शंख, टाळ्या आणि थाळीनाद करून आभार मानले. जनता कर्फ्यूला प्रतिसाद देणाऱ्या महाराष्ट्रवासियांचे आभार व्यक्त करतानाच, जनता कर्फ्यूत उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत वाढ करण्याचा निर्णयही आरोग्यमंत्री टोपे यांनी जाहीर केला.