प्रवाशांमध्ये घबराट

ठाणे:
दरभंगा येथून सुटणाऱ्या पवन एक्स्प्रेसच्या चाकांमधून धूर येऊ लागल्याने एकच घबराट उडाली. ही घटना मद्ये रेल्वेच्या कल्याण आणि टिटवाळा स्थानकादरम्यान आज दुपारी १ ते २ या वेळेत घडली. ब्रेक जॅममुळे हा धूर येत होता. मात्र प्रवासी यामुळे घाबरले.

कल्याण रेल्वे स्थानकाहून साधारणपणे ४५ कि.मी. आणि टिटवाळा रेल्वे स्थानकाहून ६० कि.मी.वर ही घटना घडली. या दोन्ही ठिकाणी ही ट्रेन १० ते १५ मिनिटे थांबवण्यात आली होती. पॉवर जनरेटर व्हॅनच्या ब्रेक बाइंडिंगमुळे ट्रेन थांबवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे प्रवक्ता शिवाजी सुतार यांनी दिली. ब्रेड बाइंडिंगच्या वेळी कधीतरी ट्रेनचे ब्रेक चाकांसोबत जाम होतात.

परिणामी पॉवर जनरेटर कोचमध्ये धूरच धूर दिसू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती